Mumbai Jobs Recruitment Saam Tv News
Video

Mumbai Jobs | मराठी माणसाविषयीची ती पोस्ट, कंपनीने मागितली माफी!

एका HR रिक्रूटरने लिंक्डइनवर नोकरीची माहिती देणारी पोस्ट केली. मात्र यामध्ये Marathi people are not welcome here असं लिहिल्यामुळे नेटिझन्स संताप व्यक्त करत आहेत.

Saam TV News

Mumbai Jobs | मुंबईत कशा प्रकारे मराठी तरुणांना नोकरीची संधी मिळत नाही याबाबत आपण नेहमीच वाचत, पाहत असतो. आता सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे. एका HR रिक्रूटरने लिंक्डइनवर नोकरीची माहिती देणारी पोस्ट केली. मात्र यामध्ये Marathi people are not welcome here असं लिहिल्यामुळे नेटिझन्स संताप व्यक्त करत आहेत. एका फ्रीलान्स HR रिक्रूटरने मुंबईतील एका कंपनीसाठी ग्राफिक डिझाईनर हवा आहे अशी पोस्ट केली आहे. यासाठी जॉब लोकेशन गिरगाव आहे. तसंच पगार 4.8 LPA एवढा असल्याचं यात सांगितलं आहे. यानंतर इतर माहितीमध्ये कँडिडेटकडे कोणते स्किल्स असायला हवेत याबाबत माहिती दिली आहे. मात्र यासोबतच मराठी लोकांना अप्लाय करता येणार नसल्याचंही याठिकाणी स्पष्टपणे नमूद केलं आहे. यामुळेच या लिंक्डइन पोस्टचा स्क्रीनशॉट एक्स आणि इतर सोशल मीडिया हँडल्सवर व्हायरल होतो आहे. पोस्ट व्हायरल झाल्यानंतर मात्र रिक्रूटरने सोशल मिडियावर माफी मागितली आहे.. अनेक मराठी भाषिकांचं मन दुखावलं या बद्दल त्यांनी माफी मागितली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solar Eclipse 2025: सूर्यग्रहणाच्या दिवशी दान करा 'या' गोष्टी, होतील अनेक लाभ

Maharashtra Live News Update: पाचोरा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस बामणी व दगडी नदीला पूर,

Mumbai Rain: स्वत:चा जीव धोक्यात घालून पाण्याला करून दिली वाट, बीएमसी कर्मचाऱ्याचा VIDEO व्हायरल

Avneet Kaur: जेन झी मुलींनी ग्लॅमरस लूकसाठी फॉलो करा अवनीत कौरच्या स्टायलिंग टिप्स

Nashik Accident: नाशिक- मुंबई महामार्गावर अपघाताचा थरार, बसची कारला जोरदार धडक; १५ ते २० प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT