kalyan dombivli corporators not reacheble saam tv
Video

कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात मोठी खळबळ; ठाकरेंचे ४ नगरसेवक नॉट रिचेबल!

kalyan dombivli thackeray sena corporators not reachable : कल्याण-डोंबिवलीत सत्तासंघर्ष पेटला असतानाच ठाकरे गटाचे ४ नवनिर्वाचित नगरसेवक हे नॉट रिचेबल आहेत. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे ठाकरे सेनेच्या नेत्यांनी सांगितले.

Nandkumar Joshi

कल्याण-डोंबिवलीची निवडणूक भाजप आणि शिंदेसेना यांच्यात चुरशीची झाली होती. त्यावेळी संपूर्ण निवडणूक प्रचार ते निवडणूक निकालापर्यंत फक्त या दोनच पक्षांची चर्चा होती. पण निवडणूक निकालानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे ११ नगरसेवक निवडून आले आहेत. पण गटस्थापनेवेळी अचानक चार नगरसेवक नॉट रिचेबल झाले आणि चर्चांना उधाण आलं.

शिवसेना ठाकरे गटाचे दोन नवनिर्वाचित नगरसेवक आधीच नॉट रिचेबल होते. त्यानंतर गटस्थापनेवेळी उरलेल्या नऊपैकी आता आणखी दोन नगरसेवक गैरहजर राहिले. स्वप्नाली केणे आणि राहुल कोट हे दोन नगरसेवक अनुपस्थित होते. अखेर ठाकरे गटाच्या सात नवनिर्वाचित नगरसेवकांचा गट स्थापन झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. याआधी ठाकरे गटाचे मधुर म्हात्रे आणि किर्ती ढोणे हे नॉट रिचेबल होते. आता केणे आणि कोट हे दोघे संपर्कक्षेत्राच्या बाहेर गेले आहेत.

याबाबत आमदार वरूण सरदेसाई म्हणाले की, कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाकडून नगरसेवकांची गटनोंदणी करण्यासाठी आम्ही कोकण विभागीय आयुक्तांकडे आलो होतो. जे नगरसेवक आमच्या पक्षाकडून निवडून आले आहेत, त्यातील काही नगरसेवक आलेले नाहीत. त्यांच्याशी संपर्क सुरू आहे. पण ते पलटी मारणार असतील तर मतदार त्यांना माफ करणार नाहीत. जे नगरसेवक आले नाहीत, त्यांच्याशी संपर्काचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच ते आमच्यासोबत येतील असा विश्वास आहे, असेही सरदेसाई म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'शाह' पर्व सुरू! सर्वात तरूण नेत्यानं घेतली नेपाळच्या पंतप्रधानपदाची शपथ

Maharashtra Live News Update: लॉकडाउनची अफवा पसरवणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करणार-देवेंद्र फडणवीस

Titwala crime news: क्रिकेट कोचकडून २ अल्पवयीन मुलींचा विनयभंग, शरीराला चुकीच्या पद्धचीने स्पर्श करायचा अन्...

Chanakya Niti: खरंच चुकीचे निर्णय घेतल्याने लोक यशस्वी होतात? चाणक्यांनी सांगितले ४ महत्वाचे सल्ले

Fafda Recipe: घरच्या घरी गुजराती स्टाईल फाफडा कसा बनवायचा? वाचा झटपट होणारी रेसिपी

SCROLL FOR NEXT