maharashtra Political news saam tv
Video

पुन्हा मोठा राजकीय भूकंप! एकवेळ भाजपसोबत जाऊ, पण शिंदेंसोबत नाही; राऊतांनी बॉम्ब फोडला

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. एकवेळ भाजपसोबत जाऊ शकतो, पण शिंदेसेनेसोबत युती मान्य नाही, असं ठाकरेंचे खासदार संजय राऊत म्हणाले.

Nandkumar Joshi

महापालिकांच्या निवडणुका झाल्या आहेत. निकाल जाहीर झालेत. सर्वात मोठा पक्ष भाजप ठरला आहे. मुंबईत ठाकरे बंधूंना काहीसं यश मिळालं असलं तरी सत्ता निसटली आहे. आता महापौरपद आणि सत्तास्थापनेच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. अनेक ठिकाणी भाजपनंतर शिंदेसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे महापौर आणि सत्तेत कोण बसणार याचा पेच वाढला आहे. त्यात राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याचे संकेत मिळाले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हा बॉम्ब फोडला आहे.

राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते, असे संकेत आहेत. एकवेळ भाजपसोबत जाण्याचा विचार होऊ शकतो, पण शिंदेसेनेसोबत युती मान्य नाही, असे संजय राऊत म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुंबईत काहीही घडू शकतं, असं सूचक विधान मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केलं आहे. त्यामुळं आगामी दिवसांत नवी राजकीय समीकरणं तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आमच्यातून अद्याप काही निर्णय झाला नाही. आम्ही अशा प्रस्तावांना अनेकदा केराची टोपली दाखवतो. भाजपसोबत काही ठिकाणी म्हणजे अत्यंत अस्थिरता आहे, तिथे आम्ही शिंदेंसोबत कदापि जाणार नाही. जिथं काही पर्याय उपलब्ध असतील त्यासंदर्भात पक्षप्रमुख निर्णय घेतील. परस्पर कुणीही काही निर्णय घेणार नाही, असे राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : दावोस दौऱ्यामुळे 30 लाख कोटींची गुंतवणूक - CM फडणवीस

बीडमध्ये गुंडाराज सुरूच! किरकोळ कारणावरून तरुणाला काळंनिळं होईपर्यंत मारलं

वर्सोवा कोळी फूड फेस्टिव्हल २०२६ला उद्यापासून सुरुवात, कोळी खाद्यसंस्कृतीचा भव्य उत्सव

White Dress: प्रजासत्ताक दिनी ट्राय करा 'हे' पांढऱ्या रंगाचे सुंदर आणि ट्रेंडी ड्रेस

Mayor Race : कल्याण-डोंबिवलीचा महापौर कोण? 3 नावांची चर्चा, मनसेची नगरसेविकाही शर्यतीत आघाडीवर

SCROLL FOR NEXT