Snake inside Dharashiv Government Women’s Hospital – screenshot from viral video showing cobra movement in maternity ward. Saam Tv
Video

Dharashiv News: अरे बापरे, सरकारी हॉस्पिटलमध्ये घुसला विषारी साप | VIDEO

Poisonous Snake: धाराशिवच्या सरकारी महिला रुग्णालयात विषारी साप शिरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Omkar Sonawane

धाराशिव : जिल्ह्यातील एकमेव महिला रुग्णालयात साप शिरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णालयात कोब्रा आणि मणियार जातीच्या सापांचा वावर दिसून आला असून, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या रुग्णालयात दररोज शेकडो महिला उपचारासाठी दाखल होत असतात. विशेषतः बाळंतपणासाठी आलेल्या महिला आणि त्यांच्यासोबत असणारी लहान मुले यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता गंभीर बनला आहे. सापासोबत उंदरांचाही वावर असल्याने रुग्णालयाच्या स्वच्छतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

दरम्यान, रुग्णालयाची अवस्था सुधारण्यासाठी बांधकाम व दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करण्यात आला असला तरी, तो अजूनही प्रलंबितच असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या संपूर्ण प्रकारावर महिला रुग्णालयाचे व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वरिष्ठ अधिकारी बोलण्यास टाळाटाळ करत आहेत. सध्या या प्रकरणावर नागरिकांनी आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या असून, महिलांच्या जीवाशी खेळ सुरू आहे, अशा शब्दांत प्रशासनाच्या निष्काळजीपणावर टीका करण्यात येत आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : भारतात अस्थिरता निर्माण करण्यासाठी अमेरिका, चीन प्रयत्नशील, प्रवीण दीक्षित यांचे मत

Ind Vs Sa: चौथ्या सामन्यात बुमराह करणार कमबॅक? पाहा सिरीज जिंकण्यासाठी कशी असेल भारताची प्लेईंग 11

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये काँग्रेसला उतरती कळा, माजी महापौर, माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

Madhuri Dixit Photos : "परी हो या हो परियों की रानी..."; गुलाबी ड्रेसमध्ये 'धक धक गर्ल'चं आरस्पानी सौंदर्य

शरद पवरांच्या खासदाराने घेतली अमित शाहांची भेट, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT