Saper Mitra rescuing the poisonous Manyar snake found hidden inside a Jupiter scooter in Kalyan’s Adharwadi area late at night. Saam Tv
Video

Snake Hidden Inside Scooter: अरे बापरे बाप! स्कुटीला स्टार्टर मारणार तोच फुसफुसला, हेडलाइटमध्ये लपला होता विषारी साप, VIDEO

Snake Rescue Operation: कल्याणच्या आधारवाडी परिसरात रात्री साडेदहा वाजता एका जुपिटर दुचाकीच्या हेडलाईटच्या आड मण्यार साप आढळला.

Omkar Sonawane

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याणच्या आधारवाडी परिसरात उशिरा रात्री घडलेल्या घटनेने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. एका जुपिटर दुचाकीच्या हेडलाईटच्या आड मण्यार जातीचा विषारी साप बसलेला आढळला. सुदैवाने, दुचाकीस्वार वेळेवर सावध झाल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना रात्री साडेदहा वाजता घडली. स्थानिक नागरिक नितीन पाटील यांनी सर्पमित्रांना कॉल करून सांगितले की त्यांच्या जुपिटर गाडीमध्ये साप शिरला आहे. माहिती मिळताच सर्पमित्र तात्काळ घटनास्थळी पोहोचले.

स्पॉटवर पोहोचल्यावर सर्पमित्रांना कळले की गाडीत बसलेला साप हा अत्यंत विषारी मण्यार आहे. परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी परिसर रिकामा करून घेतला. गाडीची तपासणी करण्यासाठी बाईक मेकॅनिक कालिदास कारभारी यांना बोलावण्यात आले. त्यांच्या मदतीने गाडीचे फ्रंट कव्हर काळजीपूर्वक उघडण्यात आले.

सर्पमित्रांनी अत्यंत दक्षतेने सापाला सुरक्षितपणे पकडले आणि काही वेळानंतर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी सर्पमित्रांच्या तत्परतेचे कौतुक केले. साप दिसल्यावर घाबरू नका, सर्पमित्रांना संपर्क साधा असे आवाहन सर्पमित्रांनी नागरिकांना केले आहे.आधारवाडी परिसरात पावसाळ्यानंतर वारंवार अशा घटना घडत असून नागरिकांनी जागरूक राहणे गरजेचे असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : राज ठाकरेंनंतर भाजप नेत्याचा आयोगावर गंभीर आरोप; थेट निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी

आमदार, खासदार, नगरसेवक त्यांचेच आणि चापट मारून तुम्हाला मतदान करायला सांगतील, जैन मुनींचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: ईव्हीएम स्ट्रॉंग रूम बाहेर गणवेशधारी खाजगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहे

धुळ्यात अवैध देहविक्रीच्या व्यवसायावर पोलिसांचा छापा; झोपड्यांवरही बुलडोझर फिरवला

Loan Tips: पहिल्यांदा लोन घेत असताना कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे?

SCROLL FOR NEXT