PM Modi set to meet President Xi Jinping during the SCO Summit in China – first visit since the 2020 Galwan clash. Saam Tv
Video

PM Modi To Visit China: ट्रम्पचा टॅरिफ वॉर, भारताचा नवा डाव; PM मोदी जाणार चीन दौऱ्यावर | VIDEO

PM Modi’s First China Visit Since Galwan Clash: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चीन दौरा भारत-चीन संबंधांमध्ये महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांवर टीका करत अमेरिकन डॉलर कमजोर करण्याचा आरोप केला आहे.

Omkar Sonawane

  • पंतप्रधान मोदी चीनमध्ये होणाऱ्या SCO परिषदेसाठी 2025 मध्ये चीनला जाणार आहेत.

  • 2020 च्या गलवान संघर्षानंतर मोदींचा हा पहिला चीन दौरा असेल.

  • ट्रम्प यांनी ब्रिक्सवर टीका करत डॉलर कमकुवत करण्याचा आरोप केला आहे.

  • मोदी याआधी जपानचा दौरा करून 30 ऑगस्ट रोजी फुमियो किशिदा यांची भेट घेणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्यात चीनमध्ये होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटना (SCO) शिखर परिषदेतील सहभागासाठी चीनला (China) जाणार आहेत. पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात 2020 मध्ये भारत-चीन सैन्यांमध्ये झालेल्या संघर्षानंतर मोदींचा हा पहिला चीन दौरा ठरणार आहे. हा दौरा भारत आणि चीन या दोन्ही देशांकडून द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या प्रयत्नांचा भाग मानला जात आहे. एससीओ शिखर परिषद चीनमध्ये 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान पार पडणार आहे. पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्रपती Xi Jinping शी जिनपिंग यांची शेवटची भेट ऑक्टोबर 2024 मध्ये रशियात झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान झाली होती.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानुसार, या परिषदेत 20 हून अधिक देशांचे नेते आणि 10 आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रमुख सहभागी होणार आहेत. चीनमध्ये होणाऱ्या या परिषदेत सहभागी होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी जपानचा दौरा करणार आहेत. 30 ऑगस्ट रोजी मोदी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यासोबत वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होतील. याआधी मोदींनी 2019 मध्ये चीनचा दौरा केला होता. या दौऱ्यात व्यापार सहकार्य, दहशतवाद, प्रादेशिक सुरक्षा आणि बहुपक्षीय सहकार्य यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

पंतप्रधान मोदींचा हा दौरा अशा काळात होत आहे, जेव्हा अमेरिका भारतावर सातत्याने टॅरिफ वाढवण्याच्या धमक्या देत आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प् यांनी असा दावा केला आहे की, ब्रिक्स देश अमेरिकेच्या डॉलरला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

ट्र्म्प म्हणाले होते, ब्रिक्सची स्थापना अमेरिकेला नुकसान पोहोचवण्यासाठी आणि डॉलरला कमकुवत करण्यासाठी झाली होती. जर हा गट शक्तिशाली झाला, तर तो लवकरच नष्ट होईल. सध्या हा गट कमकुवत होत चालला आहे. डॉलरचा दर्जा गमावणे म्हणजे एखाद्या जागतिक युद्धात पराभूत होण्यासारखे आहे. आम्ही डॉलरला कोसळू देणार नाही.

15 जून 2020 रोजी पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारतीय आणि चीनी सैन्यांमध्ये झालेल्या झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाले होते. भारतीय जवानांनी तेव्हा अस्त्र-शस्त्र न वापरता विद्यमान प्रोटोकॉलनुसार प्रत्युत्तर दिले होते. या संघर्षात चीनच्या सैन्याचेही मोठे नुकसान झाले होते, मात्र चीनने अद्याप त्याची अधिकृत कबुली दिलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Rules : बँक खात्यात ठेवावे लागणार 50 हजार रुपये? काय आहे नवा नियम? VIDEO

Mumbai Metro7A: ट्रॉफिकचं नो टेन्शन; दहिसर ते एअरपोर्ट फक्त ५० मिनिटात पोहोचा, जाणून घ्या Metro 7चा मार्ग, तिकीट दर अन् थांबे

रिक्षाचालकांची तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल झाल्यानंतर खळबळ

Shocking : मुंबईचा तरुण लातुरात आला, लाईव्ह येऊन सगळं सांगितलं; नंतर अचानक आयुष्य संपवलं

Sunday Horoscope : संडे ४ राशींसाठी ठरणार धोक्याचा? जाणून घ्यायचं असेल तर वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT