Mahayuti Oath Taking Ceremony SaamTv
Video

PM Narendra Modi : शपथविधीची सांगता; पंतप्रधान मोदींनी केलं महाराष्ट्राच्या जनतेला नमन

Mahayuti Oath Ceremony : विधानसभा निवडणुकीनंतर अखेर आज राज्यात महायुतीचं नवीन सरकार स्थापन झालं आहे. राज्याच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले आहेत. तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली आहे.

Saam Tv

राज्यातील विधानसभा निवडणुकीचं वादळ 23 तारखेला शमलं. या निवडणुकीत महायुतील आणि मुख्यत्वे भाजपला मिळालेला विजय ऐतिहासिक हा अनपेक्षित होता. त्यानंतर बहुमत मिळूनही 11 दिवस चाललेल्या सत्तास्थापनेच्या नाराजी नाट्यावर पडदा टाकत काल सत्ता स्थापनेचा दावा राज्यपालांकडे करुन आज महायुतीने नवीन सरकार स्थापन केलं. मुंबईच्या आझाद मैदानावर शपथविधी सोहळा नुकताच पार पडला असून यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शाह हे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणून भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे. तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. या शपथविधीच्या सांगतेनंतर पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित सर्व जनतेला वाकून हात जोडत नम्रपणे अभिवादन केलेलं दिसलं. महाराष्ट्राच्या जनतेने दिलेल्या कौलावर त्यांनी आज शब्दाविना दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरत आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live Update: नागपुरात बडकस चौक मित्र परिवार तर्फे दहीहंडी स्पर्धेच आयोजन

Horoscope Saturday : गोपाळकाला जाणार या 6 राशींसाठी लाभाचा, प्रवासातून होईल फायदा; वाचा शनिवारचे राशीभविष्य

Wall Collapse Tragedy : दर्ग्याची भिंत कोसळली; 5 जणांचा मृत्यू,आकडा वाढण्याची भीती

Mangalgad fort : पावसात ट्रेकिंगचा लुटा मनमुराद आनंद, 'मंगळगड' ची एकदा सफर कराच

PAN Card Security : पॅन कार्डचा गैरवापर कसा ओळखाल? आर्थिक फसवणुकीपासून वाचण्याचे सोपे उपाय

SCROLL FOR NEXT