ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रविवारी ७ सप्टेंबर रोजी चंद्रग्रहणासह पितृपक्षाचा पहिला दिवसही आहे.
या दिवशी पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली जाते.
पितृपक्षात पूर्वजांना पाणी अर्पण करण्याचा म्हणजेच तर्पणाचा प्रमुख विधी केला जातो.
अशावेळी काही महत्त्वाचे नियम लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
पितरांना तर्पण शक्यतो दुपारच्या वेळेत करावे.
दक्षिण दिशा पूर्वजांची दिशा मानली जाते. त्यामुळे तर्पण करताना दक्षिणेकडे तोंड करून बसा.
तर्पण करताना जाणवे खांद्याच्या उजव्या बाजूला ठेवा.
तर्पण करण्यासाठी तांब्याचे भांडे वापरा. स्वच्छता राखा.
पितृपक्षाचे सर्व विधी करताना पुरोहितांकडून योग्य माहिती घ्या.