Why 2.5 lakh farmers removed from PM Kisan in Maharashtra केंद्र सरकारच्या किसान सन्मान योजनेतून महाराष्ट्रातील अडीच लाख शेतकऱ्यांना वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आधार, इन्कम टॅक्स आणि शिधापत्रिकेच्या आधारे पडताळणी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरात ९२ लाख तर महाराष्ट्रात २० लाख शेतकरी या योजनेचा लाभ घेत होते. मात्र, आता नवीन नियमांनुसार एकाच कुटुंबातील पती-पत्नी दोघेही लाभार्थी असल्यास, केवळ एकालाच लाभ मिळतो. विशेषतः पत्नीला, लाभ दिला जाणार आहे. (PM Kisan Aadhaar and Income Tax verification process)
'एकाच कुटुंबात एकच शेतकऱ्याला लाभ देण्यात येणार आहे, त्यामुळे पती आणि पत्नी या दोघांपैकी पत्नीला हा लाभ देण्यात येणार असल्याचं सरकारमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समोर येतंय.' या निर्णयामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना योजनेचा लाभ गमवावा लागणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.