PCMC officials at the site in Sangvi where a woman allegedly threatened to throw her child and commit suicide to stop demolition of unauthorized construction. Saam Tv
Video

...तर बाळाला फेकून देईन अन् मीही आत्महत्या करेल, PCMC अधिकाऱ्याला महिलेची धमकी|VIDEO

PCMC Encroachment Squad Faces Emotional Protest: सांगवीतील अनधिकृत बांधकामावर कारवाईसाठी गेलेल्या पीसीएमसी पथकासमोर महिलेने बालकाला फेकण्याची व आत्महत्या करण्याची धमकी दिली.

Omkar Sonawane

पिंपरी चिंचवड: अनधिकृत बांधकामावर कारवाईसाठी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकासमोर एका महिलेने बांधकाम पाडले तर माझ्या बाळाला खाली फेकून देईन व मीही आत्महत्या करीन, अशी धमकी दिली. या प्रकरणी दोघांविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी परिसरात राजाराम लाड आणि निलेश लाड यांनी अनधिकृत बांधकाम केलं होतं. हे बांधकाम पाडण्यासाठी महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी गेले असता लाड कुटुंबातील सदस्यांनी तीन वर्षांच्या बालकाला जाळीतून खाली फेकण्याची धमकी दिली.

तसेच त्यांनी पथकाला शिवीगाळ केली आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात बीएनएस कलम 132, 352, 351 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अमोल नांदेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल होताच दोघेही आरोपी फरार झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Passes Away: प्रसिद्ध अभिनेत्याचा अकाली मृत्यू; मनोरंजन विश्वावर शोककळा

Maharashtra Politics: भाजप प्रवक्त्या मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीश, आरती साठेंच्या नेमणुकीवर पवारांचा गंभीर आरोप

Onion : चाळीत ठेवलेला ७०० क्विंटल कांदा जाळला; सात लाख रुपयांचे नुकसान, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

Maharashtra Live News Update : नवी मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराविरुद्ध स्थानिकांचे आणि माजी नगरसेवकांचे साखळी उपोषण

धावत्या एक्स्प्रेसच्या टॉयलेटमध्ये बलात्कार झाल्याचं तरुणीनं सांगितलं, पण CCTV फुटेजमुळं हादरवणारं सत्य आलं समोर

SCROLL FOR NEXT