Rising potato stocks in Rahata markets as prices continue to fall, causing financial distress to local farmers. Saam Tv
Video

पेरूचे भाव गडगडले, शेतकऱ्यांचे गणित कोलमडले; पेरू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात|VIDEO

Government Support For Peru Farmers: राहाता तालुक्यात पेरूचे भाव गडगडल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक दृष्ट्या मोठा फटका बसला आहे. खतांचा वाढलेला खर्च आणि बाजारभाव कमी झाल्याने शेतकरी संकटात आहेत.

Omkar Sonawane

पेरूचे भाव गडगडल्याने पेरू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. पेरूच्या भावात किलोमागे 15 ते 20 रुपयांची घसरण झाल्याने उत्पादन खर्च निघणेही कठीण झालंय. एकीकडे अतिवृष्टीने बळीराजा अस्मानी संकटात सापडल्याचे चित्र असताना दुसरीकडे पेरूचे भाव गडगडल्याने पेरू उत्पादक शेतकरी हवालदील झाले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुका पेरूचे आगार म्हणून ओळखला जातो. इथल्या पेरू फळांना राज्यासह परराज्यातही मोठी मागणी असते.

चांगले आर्थिक उत्पन्न मिळत असल्याने हजारो एकर क्षेत्रावर पेरू लागवड करण्यात आली आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून खतांचे वाढलेले भाव, निसर्गाचा लहरीपणा आणि दरामधील घसरण अशा विविध कारणांमुळे पेरू उत्पादक आर्थिक संकटात सापडले आहेत. पूर्वी चांगल्या क्वॉलिटीच्या पेरूला किलोमागे किमान 25 ते 30 रुपये भाव मिळायचा. मात्र, आवक जास्त वाढल्याने भावामध्ये मोठी घसरण झाली असून दर 5 ते 7 रुपये किलोपर्यंत खाली आले आहेत. शासनाने स्थानिक पातळीवर प्रोसेसिंग प्लांट उभारून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी पेरू उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: ग्लोइंग स्कीन हवीये? मग दररोज चेहऱ्यावर करा दुधाने मसाज

Pune Crime: पुण्यात चाललंय काय! व्यवसायिक दांपत्याला टोळक्याकडून लाठ्या काठ्याने मारहाण|Video Viral

कुंभक्षेत्र त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना बेदम मारहाण; पोलिसांनी आवळल्या गावगुंडांच्या मुसक्या

Phone Cover: फोन कव्हर वापरल्याने कोणते नुकसान होतात?

Maharashtra Live News Update: पवई विभागात प्रेम प्रकरणात मुलाने राहत्या घरात आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT