Washim news  saam tv
Video

Washim News: शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाच्या पोटाची त्वचा भाजली, जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक घटना, पाहा व्हिडिओ

Patient’s Skin Burned During Surgery: वाशिम जिल्हा रुग्णालयात १९ मे रोजी अपेंडिक्सच्या शस्त्रक्रियेच्या दरम्यान रुग्णाच्या पोटाची त्वचा भाजल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Omkar Sonawane

वाशिम जिल्हा रुग्णालयात १९ मे रोजी अपेंडिक्सच्या शस्त्रक्रियेच्या दरम्यान रुग्णाच्या पोटाची त्वचा भाजल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शस्त्रक्रियेनंतर दोन दिवसांनी जेव्हा रुग्णाच्या नातेवाईकांनी त्याच्या पोटावर भाजल्याचे घाव पाहिले, तेव्हा त्यांनी तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन याची चौकशी केली.

डॉक्टरांनी या घटनेमागे "तांत्रिक बिघाड" असल्याचे सांगत ती अनावधानाने घडल्याचे स्पष्टीकरण दिले. मात्र, नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाच्या गंभीर हलगर्जीपणाचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी संबंधित तक्रार नोंदवून तपास सुरू केला असून, या घटनेमुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील कार्यपद्धती, तांत्रिक उपकरणांची स्थिती आणि शस्त्रक्रियेतील सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

रुग्णाच्या कुटुंबीयांनी दोषी डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. आरोग्य विभागाकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य देण्यात आलेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Oxidized Jhumka Designs : गरबा नाइटसाठी परफेक्ट! ऑक्सिडाइज्ड झुमक्यांचे ७ लेटेस्ट डिझाइन्स, घागरा-चोळीवर दिसतील खुलून

Maharashtra News Live Update: एसटी कर्मचाऱ्यांचा ६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संपाचा इशारा

Gold Rate Today: सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण, १ तोळ्यासाठी किती रुपये द्यावे लागणार; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

अभिनेता आमिर खानच्या भाच्याला मोठा झटका! आंदोलनात सहभागी होणे पडले महागात; मुंबई पोलिसांनी दिली देश सोडण्याची नोटीस

Fennel Seeds Milk Benefits For Back Pain: दुधात बडीशेप मिसळून पिण्याचे 5 आश्चर्यकारक फायदे, कंबरदुखी आणि थकवा होईल झटपट दूर

SCROLL FOR NEXT