VIDEO: Chhatrapati Sambhajinagar मधील टोलनाक्यावर कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांना मारहाण Saam TV
Video

VIDEO: Chhatrapati Sambhajinagar मधील टोलनाक्यावर कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांना मारहाण

Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरमधील टोलनाक्यावर कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांना मारहाण, एक जण गंभीर जखमी, तर चार जणांना जबर मारहाण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

छत्रपती संभाजीनगरजवळील करोडी टोलनाक्यावर कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांना मारहाण करण्यात आली आहे. रात्री साडेनऊच्या सुमारास पाच प्रवाशांना टोलनाक्यावरील कर्मचारी आणि त्यांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली आहे. यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. इतर चार जणांना जबर मारहाण झाल्याने त्यांच्यावर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. टोल बॅरिगेट बंद का केलेत आणि एक बॅरिगेट सुरू करा अशी विनंती करायला गेलेल्या प्रवाशांना मारहाण करण्यात आली आहे. जखमी झालेले सर्व छत्रपती संभाजीनगर शहरातील व्यावसायिक आहेत. कॉन्फरन्स आटोपून नाशिकवरून परत येत असताना करोडी टोल नाक्यावर सहा बॅरिगेट बंद होते. केवळ एक बॅरिगेट सुरू होता, त्यामुळे ट्रॉफिक झालं होतं. एक बॅरिगेट उघडून ट्रॉफिक कमी करा अशी विनंती करायला गेल्यानंतर कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला हुज्जत घातली. त्यानंतर शिवीगाळ करून मारहाण करायला सुरुवात केली असे जखमी झालेल्या प्रवाशांनी सांगितले. तिथल्या कर्मचाऱ्यांनी गज, पाईप, बेल्ट, दगडाचा वापर करून प्रचंड मारहाण केली असल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail health: पिवळी नखं, काळी रेष...नखांवर दिसणारे हे 7 बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Maharashtra News Live Update: संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चा

Gold Rate Today : सणासुदीच्या काळात सोनं महागलं, १ तोळ्याची किंमत किती? जाणून घ्या 22k, 18k, 24k चे ताजे दर

LPG Subsidy : १ ऑक्टोबरपासून LPG ग्राहकांसाठी नवा नियम; सबसिडी हवी असेल तर आजच करा हे काम

Water for kidney health: किडनी खराब होऊ नये म्हणून दिवसातून किती पाणी प्यायलं पाहिजे?

SCROLL FOR NEXT