Farmer attacks Parbhani District Collector’s car; police launch probe after stone pelting incident. Saamtv
Video

Parbhani: नांदेडनंतर आता परभणीत अधिकाऱ्याच्या गाडीवर हल्ला; जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक

Parbhani Parbhani Stone Pelting : नांदेडनंतरआणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. परभणीमध्ये एका शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर दगडफेक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Bharat Jadhav

नांदेडमध्ये तहसीलदारांची गाडी फोडल्याची घटना ताजी असतानाच आज परभणीतही शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर दगडफेक केल्याची घटना घडलीय. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पालम तालुक्यातील चाटोरी येथील शेतकऱ्यानं जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांच्या गाडीवरच दगडफेक केली. संतोष रावण पैके असं या शेतकऱ्यान नाव आहे. संपूर्ण कर्जमाफी मिळावी, तसेच अतिवृष्टी व पावसामुळे झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई द्यावी या मागणीसाठी शेतकऱ्यानं जिल्हाधिकाऱ्याच्या गाडीवर दगडफेक केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी संजय चव्हाण स्वतः उपस्थित असताना अचानक संतोष पैके यांनी गाडीवर मोठा दगड फेकला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8000mAh बॅटरी, कॅमेरा, फीचर्स आणि डिजाइनही जबराट; बाजारात हटके मोबाईल लाँच होणार?

Maharashtra Live News Update: काँग्रेस -मनसे आघाडीबाबत विजय वडेट्टीवार यांचं पुन्हा भाष्य

Pune : गावाकडून शहराकडे...! पुण्यात कोयता गँगनंतर बिबट्याची दहशत; सतर्क राहा पण घाबरू नका, वन विभागाचं आवाहन

Gauri Palwe: गर्भपात अन् कागदावर अनंतचं नाव; गौरी पालवे आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण, अडगळीच्या वस्तूंमध्ये सापडले महत्त्वाचे पेपर

Monday Horoscope : श्री गणरायांची कृपादृष्टी पडणार; ५ राशींच्या लोकांना मिळणार शुभसंकेत

SCROLL FOR NEXT