Pankaja Munde SaamTv
Video

Pankaja Munde : ''त्यांचा पहिलाच मेळावा .. ''; मनोज जरांगेच्या दसरा मेळाव्यावर पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य

Dasara Melava : आज भगवान गडावर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा दसरा मेळावा होणार आहे. तर दुसरीकडे नारायण गडावर मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा होत आहे. त्यामुळे या दोन्ही मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Saam Tv

मनोज जरांगे पाटील मेळाव्यात काय बोलतील हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. त्यांच्या आणि आमच्या मेळाव्याचा काही संबंध नाही, माझा मेळावा हा पारंपारिक मेळावा आहे, त्यांचा हा पहिला मेळावा आहे. माझ्या मेळाव्यासाठी सर्व जाती धर्माचे लोकं येणार आहेत. मात्र त्यांचा पहिलाच मेळावा असल्याने त्याकडे आमचं देखील लक्ष लागलं आहे, असं वक्तव्य भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांनी केलं आहे. भगवान भक्तीगडावर आज दुपारी पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होत आहे. त्या आधी त्यांनी माध्यमांशी साधलेल्या संवादात हे विधान केलं आहे.

सावरगाव हे भगवान बाबा यांचे जन्म गाव आहे. तिथे आम्ही मोठ्या प्रमाणात जात त्यांचे आशीर्वाद घेतो. मी आणि धनंजय मुंडे यांनी यापूर्वी असा मेळावा घेतला नाही. ही पहिली वेळ आहे. यापूर्वी गोपीनाथ मुंडे मेळावा घेत होते, पण तेव्हा मी आणि धनंजय मुंडे खाली बसून भाषण ऐकत होतो. धनंजय मुंडे आणि मला एका मंचावर येण्याची सवय झाली आहे. 10 वर्षांपासून मेळावा घेत आहे, मेळाव्यातील माझं भाषण ऐकण्यासाठी राज्यभरातून लोकं येत असतात. माझ्या मेळाव्यासाठी सर्व जाती धर्माचे लोकं येणार आहेत. मात्र नारायण गडावर होणार मनोज जरांगे यांचा पहिलाच दसरा मेळावा आहे, त्यामुळे ते काय बोलणार याकडे आमचं देखील लक्ष लागलं आहे, असं यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी म्हंटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर, कारण अस्पष्ट

Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री थरार, जत्रेत जायंट व्हीलमध्ये १८ जण अडकले, ५ तास आकाशात मृत्यूशी झुंज| VIDEO

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात येणार; कारण काय? वाचा

Famous Singer : प्रसिद्ध गायिकेचा छळ; विरोध करणाऱ्या भावाला झाडाला बांधले अन् बेदम मारहाण

IND vs AUS playing 11 : अर्शदीपला बाहेरचा रस्ता, कुलदीपची एन्ट्री; शुभमनची सैना क्लीन स्वीप टाळणार का?

SCROLL FOR NEXT