child hand stuck in lift  Saam tv
Video

लिफ्टच्या दरवाजात अडकला चिमुकलीचा हात; काळजाचा ठोका चुकवणारी घटना,VIDEO

child hand stuck in lift : लिफ्टच्या दरवाजात चिमुकलीचा हात अडकल्याची घटना घडली. पाहा काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली.

Vishal Gangurde

पिंपरी-चिंचवडमध्ये काळजाची ठोका चुकवणारी घटना घडलीये. लिफ्टमध्ये लहान मुलांकडे दुर्लक्ष करणे किती धोकादायक ठरू शकते, याची प्रचिती पिंपरी- चिंचवडमधील दिघीतील एका रहिवासी सोसायटीत आलीये. एक महिला लिप्टमध्ये चिमुकलीसोबत शिरली. त्यानंतर चिमुकलीने दरवाजावर हात ठेवला होता. लिफ्ट दुसर्‍या मजल्यावर गेल्यानंतर दरवाजा बंद होताना चिमुकलीचा हात दरवाजाच्या सापटीत अडकला. या प्रकारामुळे लिफ्टमधील सर्वच जण घाबरले. त्यांनी तातडीने चिमुकलीचा हात बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. काही मिनिटांच्या प्रयत्नानंतर चिमुकलीचा हात सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला. त्यामुळे लिफ्टमधील सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! आमदारांच्या PA आणि वाहनचालकांच्या पगारात भरघोस वाढ

Maharashtra News Live Update: यवतमाळ जिल्ह्याला पीक विम्यातून वगळंल

Property Tax Hike : मालमत्ता करात मोठी वाढ! घर खरेदी-विक्रीही महागणार; जाणून घ्या A to Z माहिती

दुकान उघडताना शटरवर चावी का वाजवतात? कारण ऐकून थक्क व्हाल

आधी नोकरीचा राजीनामा दिला, नंतर डॉक्टरनं उचललं टोकाचे पाऊल; आरोग्य विभागात खळबळ

SCROLL FOR NEXT