VIDEO : पंढरपुरात तिरंगी फुलांनी सजला विठूरायाचा गाभारा SAAM TV
Video

VIDEO : पंढरपुरात तिरंगी फुलांनी सजला विठूरायाचा गाभारा

Pandharpur Vitthal Temple : भारतीय स्वातंत्र्य दिनाचा उत्सव आज  देशभर साजरा केला जात असतानाच, आध्यात्मिक राजधानी असलेल्या  पंढरपूरच्या  विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही तितक्याच  देश भक्तीने हा उत्सव साजरा केला जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारतीय स्वातंत्र्य दिनाचा उत्सव आज  देशभर साजरा केला जात असतानाच, आध्यात्मिक राजधानी असलेल्या  पंढरपूरच्या  विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही तितक्याच  देश भक्तीने हा उत्सव साजरा केला जात आहे.
विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हिरवा ,पांढरा आणि केशरी या  तीन रंगाच्या फुलांची आकर्षक अशी सजावट केली. यासाठी झेंडू,तुळस  आणि गुलछडी या पाना फुलांचा वापर करण्यात आला आहे. तिरंग्याची सजावट केल्याने विठ्ठल मंदिरात विठ्ठल भक्ती बरोबर देशभक्तीचा माहोल तयार झाला आहे. देवाचे प्रवेश द्वार, चौखांबी,सोळखांबीसह मंदिरात फुलांची सजावट केली आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विठ्ठलाला आज खास  तिरंग्याचा  पोशाख देखील परिधान करण्यात आला आहे. हिरव्या रंगाचे धोतर आणि केशरी रंगाचा अंगरखा आणि गळ्यात पांढरे उपरणे असा तिरंगी पोषाख केला आहे.
रूक्मिणी मातेला ही गुलाबी रंगाची साडी आणि तिरंगी उपरणे परिधान केले आहे.तिरंगी पोषाखामुळे देवाचे रूप अधिकच खुलून दिसत आहे. देवाचे नटलेले हे रूप पाहण्यासाठी भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात मोठी गर्दी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध, पुण्याच्या बालगंधर्व चौकात आंदोलन

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT