पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात एक तळघर आढळून आलं होतं. हे तळघर सात ते आठ फूट खोल असल्याची माहिती समोर आलंय. या तळघरात काही मूर्ती आढळून आल्या आहेत. पुरातत्व विभागाच्या लोकांकडून या तळघराची पाहणी केली जाते आहे. या तळघरातील मूर्ती भग्न अवस्थेत आढळून आल्या आहेत. या मूर्ती नेमक्या कोणत्या आहेत? याचा अभ्यासही आता पुरातत्व विभागाच्या वतीने केला जाणार आहे. या तळघरात काही नाण्यांचे शिक्केदेखील सापडल्याची माहिती समोर आली आहे. या मूर्ती आणि तळघरातील संपूर्ण तपासाचा साम टीव्हीवर एक्स्क्लुझिव्ह दृश्यही या व्हिडीओच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. दुपारीच पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या परिसरात असलेल्या कान्होपात्रा मंदिराच्या येथे एक तळघर असल्याचं वृत्त समोर आलं होतं. या तळघरातून आता मूर्ती आणि काही नाण्यांचे शिक्के बाहेर काढण्यात आले पाहुकाही या तळघरात असल्याचं समोर आलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.