eid news  saam tv
Video

Bakri Eid: ईदची नमाज झाल्यानंतर फडकला पॅलेस्टाईनचा झेंडा|VIDEO

Palestinian Flag Raised After Eid Namaz : नाशिकमध्ये बकरी ईद निमित सर्व मुस्लिम बांधव शहरातील ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यासाठी जमले होते. नमाज अदा केल्यानंतर तेथे एका तरुणाने पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवला.

Omkar Sonawane

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

नाशिक: येथे बकरी ईदच्या नमाज पठणानंतर एक वादग्रस्त प्रकार घडला आहे. शहरातील ईदगाह मैदानावर नमाज अदा झाल्यानंतर पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी नाशिक पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात असतानाही हा प्रकार घडल्याने प्रशासनाची भूमिका आता प्रश्नांच्या भोवऱ्यात सापडली आहे.

नमाज पठणासाठी वरीष्ठ पोलीस अधिकारीही मैदानावर उपस्थित होते. त्यांनी नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि काही वेळातच ते तेथून रवाना झाले. त्यानंतर काही नागरिकांनी मैदानात पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवला,

या प्रकारामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. दरम्यान नाशिककरांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, सार्वजनिक ठिकाणी विदेशी झेंडा फडकवण्याच्या प्रकारावर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. याप्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया नाशिक पोलिसांकडून देण्यात आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT