Harshad Lele  saam tv
Video

Pahalgam Terror Attack: माझ्या आईला पॅरलिसिस, मी आईला पाठीवर उचलून आणले, हर्षद लेलेने सांगितला मन सुन्न करून टाकणार अनुभव|VIDEO

Emotional story of a son who saved his paralyzed mother: जम्मू काश्मीर येथील पहलगामच्या वैसरण येथे झालेल्या हल्ल्यात 26 लोकांचा मृत्यू झाला असून यामध्ये डोंबिवलीतील तीन मावस भवांचा मृत्यू झाला.

Omkar Sonawane

डोंबिवली: जम्मू काश्मीरच्या खोऱ्यात पहलगाम येथे दहशतवाद्यांनी धर्म विचारून भारतीयांवर गोळ्या झाडल्याच्या घटनेने संपूर्ण देश हा सुन्न झाला आहे. यामध्ये डोंबिवलीतील तीन मावस भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याच घटनेचा थरारक अनुभव आज हर्षद लेले या मुलाने सांगितला. ज्यावेळी गोळ्या चालल्या तेव्हा माझा हात वडिलांच्या डोक्यावर होता. मला वाटलं माझ्या हाताला काही लागलं त्यानंतर कळलं की माझ्या वडिलांनी गोळी लागली.

पहलगामच्या येथे वरती जाण्यासाठी तीन तास लागतात. ज्यावेळी हा गोळीबार झाला तेव्हा आम्हाला जितक्या लोकांना जमलं तितक्या लोकांना घेऊन आम्ही घोडा दिला, आणि आम्ही खाली उतरलो. माझ्या आईला पॅरालिसिस आहे. मी आईला पाठीवर उचलून खाली नेलं त्यानंतर घोड्यावर बसून खाली पाठवलं आणि मी आणि भाऊ खाली चालत आलो. आईला रुग्णालयात नेलं होतं. फायरिंग झाली दोन ते अडीचच्या दरम्यान आम्ही सहा वाजता पोहोचलो. मला कळलं होतं तिघांच मृत्यू झाला. आम्ही एका अधिकाऱ्याच्या घरात होतो. रात्री हाताचा उपचार केला. सकाळी मृतदेह ओळखण्यासाठी बोलवलं. त्यानंतर मी सगळ्यांना कळवलं. त्याआधी मी कोणालाही सांगितले नव्हते. असा मन भरवून टाकणार अनुभव हर्षद लेलेने सांगितला. यावेळी हर्षदचा कंठ हा दाटून आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT