harshwardhan sapkal news : Saam tv
Video

Harshwardhan sapkal : शिवरायांची टिपू सुलतानशी तुलना; हर्षवर्धन सपकाळांविरोधात मराठा आक्रमक, तोंड काळे करणाऱ्याला लाखाचे बक्षीस

Harshwardhan sapkal news : छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्या तुलनेवरून महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला असून मराठा संघटनांनी तीव्र निषेध नोंदवला आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण तापले आहे.

Namdeo Kumbhar

Shivaji Maharaj and Tipu Sultan comparison controversy Maharashtra : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना केल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या विधानाचा निषेध करत मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांचे तोंड काळे करणाऱ्याला १ लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी ही घोषणा केली.

डोंगरे म्हणाले की, "सपकाळ यांनी शिवरायांचा अपमान केला आहे. त्यांनी तातडीने प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी. अन्यथा त्यांना राज्यात कुठेही फिरू दिले जाणार नाही."

यावेळी डोंगरे यांनी सपकाळ यांच्यावर जहरी टीका केली. "सपकाळ यांनी आपल्या बापाच्या नावापुढे टिपू सुलतानचे नाव लावावे आणि मग तुलना करावी," अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला. शिवरायांच्या अपमानामुळे मराठा समाज आक्रमक झाला असून ठिकठिकाणी निदर्शने सुरू झाली आहेत. या वादाने आता राजकीय वळण घेतले असून सपकाळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, आधी गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला

Maharashtra News Live Update: राहुल गांधींच्या अमित शहांवरील आरोपांनंतर लोकसभेत गोंधळ; कामकाज दुपारी ३ पर्यंत स्थगित

चांदीच्या अंगठ्यांच्या एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स; जी बघाल ती आवडेल

Rakhi Sawant slams Kangana Ranaut: 'आधी स्वतःचं चारित्र्य पाहा'; कंगना रणौतला चुडैल म्हणत राखी सावंत भडकली

Kalyan : कल्याण हादरलं! काळा तलावात सापडला १७ वर्षीय मुलीचा मृतदेह; पोलिसांनी ३२ कॅमेरे चेक केले अन्...

SCROLL FOR NEXT