Kanda Express : कांदा एक्स्प्रेस लासलगाव येथे रोखली, VIDEO Saam TV
Video

Kanda Express : कांदा एक्स्प्रेस लासलगाव येथे रोखली, VIDEO

Prahar leader Ganesh Nimbalkar stops onion express carrying onions to Delhi : लासलगाव येथून ८५० टन कांदा घेऊन दिल्लीकडे जाण्याच्या तयारीत असलेली कांदा एक्स्प्रेस प्रहारने रोखली. सध्या ही एक्स्प्रेस मालधक्क्यावर उभी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Nandkumar Joshi

अजय सोनावणे, नाशिक | साम टीव्ही

एनसीसीएफचा ८५० टन कांदा घेऊन लासलगावहून दिल्लीकडे रवाना होण्याच्या तयारीत असलेली कांदा एक्स्प्रेस प्रहारचे गणेश निंबाळकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकातील मालधक्क्यावर रोखून धरली. रॅकमध्ये सडका आणि खराब कांदा पाठवला जात असल्याचा आरोप निंबाळकर यांनी केला. तसेच एनसीसीएफच्या अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरले. त्यामुळे काही वेळ गोंधळ उडाला.

रेल्वे पोलीस आणि आरपीएफचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी निंबाळकरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण ते काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे कांदा एक्स्प्रेस सध्या तरी लासलगाव रेल्वे स्थानकाच्या मालधक्क्यावर उभी आहे. नाफेड आणि एनसीसीएफने परराज्यातून हलक्या प्रतीचा सडका कांदा नाशिक जिल्ह्यात आणला होता. त्याची पोलखोल झाली. अशा परिस्थितीत तो कांदा परराज्यात पाठवला जात असल्याचा आरोप निंबाळकर यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI New Rules : UPI युजर्सला मोठा धक्का, ५ हजारांपेक्षा जास्त पाठवल्यास चार्ज लागणार; जाणून घ्या सरकारचा नवा नियम

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

SCROLL FOR NEXT