kundamala Saam
Video

Maval Tragedy: मावळमध्ये मोठी दुर्घटना, कुंडमळ्यातील जुना पूल कोसळला, अनेक पर्यटक इंद्रायणी नदीत वाहून गेले | VIDEO

Old Bridge Collapses in Kundmala: मावळातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला. रविवारी पर्यटनासाठी आलेले अनेक जण नदीत पडल्याची भीती. बचावकार्य सुरू असून मुसळधार पावसामुळे शोध मोहीम आव्हानात्मक.

Bhagyashree Kamble

मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहरानजीकच्या कुंडमळा या पर्यटनस्थळी रविवारी एक धक्कादायक घटना घडली. इंद्रायणी नदीवर असलेला जुना पूल अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रविवार असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी झाली होती. या दुर्घटनेत अनेक पर्यटक इंद्रायणी नदीत वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. साधारण २० पर्यटक वाहून गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, ग्रामस्थ आणि बचावपथकाने घटनास्थळी धाव घेतली. सध्या बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून, पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्यामुळे मदत कार्यात अडथळे येत आहेत. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, अनेकांचे नातेवाईक घटनास्थळी जमा झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT