mangesh sasane attack  Saam tv
Video

ओबीसी आंदोलकावर भीषण हल्ला; कारच्या काचा फोडल्या, राजकारणात खळबळ

mangesh sasane attack : ओबीसी आंदोलक मंगेश ससाने यांच्यावर भीषण हल्ला झाल्याची घटना घडली. या हल्ल्यात त्यांच्या कारच्या काचा फोडण्यात आल्या.

Vishal Gangurde

ओबीसी आंदोलक मंगेश ससाने यांच्या कारवर रात्री अज्ञाताकडून दगडफेक करत हल्ला करण्यात आल्याचं समोर आलं आहे. दोन महिन्यांपूर्वी पवन करवर याच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणाची माहिती घेण्याकरता अॅड मंगेश ससाणे हे माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गेले होते. त्यानंतर माजलगाववरून धारूरकडे जात असताना विसावा हॉटेलच्या पुढे दुचाकी वरून असलेल्या दोन अज्ञातांकडून ससाणे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. गाडीच्या मागच्या आणि बाजूच्या काचावर ही दगडफेक केली. यानंतर तात्काळ त्यांनी धारूर पोलीस ठाणे गाठत या हल्ल्याबाबतची माहिती धारूर पोलिसांना दिल्यानंतर धारूर पोलीस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ला प्रकरणाचा पुढील तपास धारूर पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

SCROLL FOR NEXT