Jalna Rain Saam Tv
Video

Jalna News: शेतात जाण्यासाठी रस्ता नाही, शेतकऱ्यांचा पाटाच्या चारीवरून जीवघेणा प्रवास; पाहा थरकाप उडवणारा VIDEO

Jalna Rain: जालन्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे नदी -नाल्यांना पूर आले आहे. या पूरात शेतकरी शेतामध्ये जाण्यासाठी जीवघेणा प्रवास करत आहेत. चारीवरून शेतकरी महिला, मुली जातानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More

शेतामध्ये जाण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्यामुळे शेतकऱ्यांना पाटाच्या चारीवरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यातील अकोला देव परिसरातील ही परिस्थिती आहे. शेतकऱ्यांच्या या जीवघेण्या प्रवासाचा व्हिडीओ समोर आला आहे. शेतात जाण्यासाठी एकच रस्ता असल्याने पर्यायी पूल बांधून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जाफराबाद तालुक्यातील अकोला देव या गावातील शेकडो शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी आजही रस्ता नसल्याने पुराच्या पाण्यातून आणि पाटाच्या चारीवरून जीवघेणा प्रवास करून आपले शेत गाठावे लागत आहे. अकोला देव आणि बुटखेडा शिवारात जवळपास ४०० ते ५०० हेक्टर जमीन असून या परिसरात थोडा जरी पाऊस पडला तरी ओढे खळखळून वाहायला लागतात. त्यामुळे या शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून हा प्रवास करावा लागतो. दरम्यान या ओढ्यावर तातडीने पूल बांधून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

Maharashtra News Live Update: बीडच्या माजलगावात टायर जाळत रास्ता रोको; लाहमेवाडी येथे प्रशासनाविरोधात संताप

Pune Waterfall : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT