MUMBAI LOCAL MEGA BLOCK news Saam Tv
Video

MUMBAI Local : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! लोकलवर कोणताही ब्लॉक नाही, ट्रेन रद्द नाहीत, पाहा अपडेट

MUMBAI LOCAL MEGA BLOCK news : NEET UG 2026 परीक्षार्थींसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय. 21 जून रोजी कोणताही मेगा ब्लॉक नसणार असून सर्व 1,820 उपनगरीय रेल्वे सेवा नियमित वेळापत्रकानुसार धावणार आहेत. विद्यार्थ्यांना आणि पालकांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्यासाठी मोठा दिलासा.

Namdeo Kumbhar

दिनांक २१ जून २०२६ रोजी NEET-2026 परीक्षार्थींच्या सोयीसाठी मध्य रेल्वेवर उपनगरीय रेल्वेच्या सर्व १८२० सेवा धावणार; या दिवशी कोणताही 'मेगा ब्लॉक' नाही. NEET UG 2026 परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी, मध्य रेल्वेने रविवार, दिनांक २१ जून २०२६ रोजी कोणताही 'मेगा ब्लॉक' न घेण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक २१ जून २०२६ रोजी रविवारचे विशेष वेळापत्रक लागू राहणार नाही. मध्य रेल्वे रविवार, दिनांक २१ जून २०२६ रोजी सर्व मार्गांवर उपनगरीय रेल्वेच्या सर्व १८२० सेवा नियमित वेळापत्रकानुसार चालविणार येणार आहे; सामान्यतः रविवारी १२०० सेवा चालवल्या जातात. यामुळे रेल्वे सेवा सुरळीत आणि विनाअडथळा सुरू राहील आणि NEET UG 2026 परीक्षेला बसणारे मोठ्या संख्येतील उमेदवार व त्यांचे पालक कोणत्याही गैरसोयीशिवाय वेळेवर परीक्षा केंद्रांवर पोहोचू शकतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT