Nitesh Rane warns Manoj Jarange after alleged remarks on Devendra Fadnavis’ mother during Maratha reservation rally in Beed. Saam Tv
Video

Manoj Jarange & Nitesh Rane: देवेंद्रजींच्या आईबद्दल अपशब्द काढले तर..वळवळणारी जीभ काढून; नितेश राणेंचा मनोज जरांगेना इशारा|VIDEO

Maratha Reservation Controversy In Maharashtra politics: बीड येथील सभेत मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप होत असून, भाजप आमदार नितेश राणे यांनी जोरदार इशारा दिला आहे.

Omkar Sonawane

मनोज जरांगे पाटील यांनी काल बीडमध्ये मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सभा आयोजित केली होती. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईविषयी अपशब्द वापरल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून केला जात आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी या संदर्भात आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर पोस्ट करत आहे. या सगळ्या वादात आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आपला एक व्हिडिओ पोस्ट करत जरांगे पाटील यांना जोरदार इशारा दिला आहे.

जे रक्ताने मराठा असतात ते कधीच कुणाच्या आईबद्दल अपशब्द वापरत नाहीत. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर करतो, त्यांनीही कायम कोणाच्याही आई बहीणींचा आदर केला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी लढाई लढावी. मात्र आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अपशब्द उच्चारण्याची हिंमत कोणी करत असेल तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याचे सामर्थ्य आमच्यासारख्या 96 कुळी माराठ्यांमध्ये आहे. मनोज जरांगे यांनी लक्षात ठेवावे असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Govinda: बायकोच्या 'त्या' विधानावरून अभिनेता गोविंदानं मागितली सार्वजनिक माफी, काय आहे प्रकरण?

नाशिकमध्ये तब्बल 3 लाख दुबार मतदार; बोगस मतदारविरोधात शिंदेसेनाच मैदानात

Election Commission: नगर परिषद, नगर पंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील?

Fact Check : मुंबईतील सोसायट्यांमध्ये फिरतंय भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Junnar leopard Attack : बिबट- माणसांचा संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

SCROLL FOR NEXT