Nashik Saam TV
Video

Nashik : नाशिमध्ये पावसाचा फटका! निफाड रेल्वेस्थानकाबाहेर ३ ते ४ फुटांपर्यंत पाणी, वाहन चालकांचे हाल | VIDEO

Niphad Railway Station Flood : नाशिक जिल्ह्यातील निफाड रेल्वेस्थानक परिसरात गेल्या काही तासांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरात ३ ते ४ फुटांपर्यंत पाणी साचले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिक जिल्ह्यातील निफाड रेल्वेस्थानक परिसरात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण परिसर ३ ते ४ फुट पाण्याखाली गेला आहे. परिणामी, प्रवासी, स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.रेल्वेस्थानकाच्या बाहेरील रस्ते जलमय झाले असून, दुचाकी व चारचाकी गाड्या अर्धवट पाण्यात अडकलेल्या स्थितीत दिसून येत आहेत. अनेक वाहनांची इंजिन बंद पडल्याने वाहनचालकांना हाताने गाड्या ढकलत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

प्रवाशांना स्टेशनकडे जाण्यासाठी गुडघ्यापर्यंत किंवा कमरेपर्यंत पाण्यातून वाट काढावी लागत आहे. पावसामुळे रेल्वेस्थानक परिसरात चिखल, गाळ साचल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे.स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांकडून मदतकार्य सुरू करण्यात आलं असलं तरी अजूनही परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. हवामान खात्याने निफाडसह नाशिक जिल्ह्यात पुढील २४ तासात अजून मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज असल्याशिवाय बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Weather Update: IMDच्या नव्या अंदाजानं शेतकऱ्यांची चिंता वाढवली; महाराष्ट्रात दोन आठवडे पावसाची दांडी

Plane Crash: अमेरिकेत आणखी एक दुर्घटना; समुद्रात कोसळले विमान

Mumbai Crime: मुंबई हादरली! तरुणाकडून अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार, गर्भवती पीडितेने दिला बाळाला जन्म

Tuesday Horoscope : वाईट संकटांचा सामना करावा लागेल, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Milk Mithai: दूधापासून घरीच बनवा 'या' टेस्टी मिठाई

SCROLL FOR NEXT