Nilesh Ghaywal Ram Shinde VIDEO saam tv
Video

Nilesh Ghaywal Video : गुंड निलेश घायवळचा भाजपच्या राम शिंदेंसोबतचा व्हिडिओ व्हायरल

Nilesh Ghaywal-Ram Shinde Video : गुंड निलेश घायवळ प्रकरणावरून राजकारण तापलं असून, भाजप नेते राम शिंदे यांचा घायवळसोबतचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Saam Tv

गुंड निलेश घायवळवरून सध्या राजकारण तापलं असून, यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी घायवळच्या भावाला शस्त्र परवाना देण्याच्या प्रकरणात दोन नेत्यांची नावं घेतली होती. त्यात भाजपच्या राम शिंदेंचंही नाव होतं. रोहित पवार यांनी आरोप केले असतानाच आता भाजपचे राम शिंदे यांच्यासोबत निलेश घायवळचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

निवडणूक प्रचारात राम शिंदे यांच्यासाठी घायवळ हा मते मागतानाचा व्हिडिओ असल्याचे सांगण्यात येत आहे. रोहित पवारांनी काही तासांपूर्वीच घायवळ प्रकरणात राम शिंदेंचे नाव घेतले होते. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. या व्हिडिओत घायवळ राम शिंदे यांच्यासाठी मते मागत असल्याचे दिसून येत आहे, असे सांगितले जाते.

दरम्यान, गुंड निलेश घायवळ याला परदेशातून आणण्याच्या प्रक्रियेला पुणे पोलिसांनी सुरुवात केली आहे. घायवळ बनावट पासपोर्ट वापरून परदेशात गेला आहे, असे सांगितले जात आहे. त्याच्यावर १५ ते २० गुन्हे दाखल आहेत. आता पुणे पोलीस घायवळला परदेशातून आणणार आहेत. त्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कोर्टाकडे तशी विनंती केली आहे. त्यावर कोर्ट उद्या निर्णय देणार असल्याचे समजते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : लुटेरी दुल्हन! मुलगी दाखवून रितसर लग्न अन् मग टोळीनं शेतकऱ्याला लुबाडले, यवतमाळमध्ये नेमकं चाललंय काय?

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार २०,००० रुपये; आताच करा गुंतवणूक

Mumbai : मुंबईत ईडीची मोठी कारवाई, २ जणांची कोट्यवधींची मालमत्ता जप्त, १२ बँक खाती गोठवली

Sleep Quality: दररोज रात्री ३ वाजता तुम्हाला गाढ झोपेतून जाग येतेय? वाचा काय आहे याचा नेमका अर्थ

Maharashtra Live News Update: माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचे निधन

SCROLL FOR NEXT