Matheran SAAM TV
Video

Matheran Mini Train : पर्यटकांसाठी खुशखबर! नेरळ-माथेरान मिनी ट्रेन ६ नोव्हेंबरपासून धावणार | VIDEO

Neral-Matheran : तब्बल सात महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नेरळ-माथेरान मिनी ट्रेन पुन्हा एकदा पर्यटकांच्या सेवेत रुजू होणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 'सहा नोव्हेंबरपासून ही सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे'.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. तब्बल सात महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नेरळ-माथेरान मिनी ट्रेन पुन्हा एकदा पर्यटकांच्या सेवेत रुजू होणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 'सहा नोव्हेंबरपासून ही सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे'. पावसाळ्याच्या काळात सुरक्षेच्या कारणास्तव मे महिन्यापासून बंद असलेली ही ऐतिहासिक ट्रेन आता पुन्हा एकदा प्रवाशांना निसर्गरम्य प्रवासाचा अनुभव देणार आहे.

विशेष म्हणजे पहिल्या गाडीत विस्टाडोम कोस्ट लावण्यात आला आहे. पर्यटकांना डोंगर द-यांमधील निसर्ग सौंदर्याचा आनंद चहू बाजूने घेता याणार आहे.मध्य रेल्वेने याबाबत अधिकृत परिपत्रक जारी केले असून, या निर्णयामुळे माथेरानच्या पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. पर्यटक आणि स्थानिक व्यावसायिक या दोघांनीही या निर्णयाचे स्वागत केले असून,ही सेवा सुरू झाल्याने पर्यटकांना आता थेट नेरळवरून मिनी ट्रेनने माथेरान गाठता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Cholesterol: या 6 सोप्या टीप्स शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवतील नियंत्रणात; हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी

ATS Raid: पाकिस्तानी गँगस्टरचे महाराष्ट्र कनेक्शन, राज्यात ATSची एकाचवेळी १५० ठिकाणी छापेमारी, ६ जण ताब्यात

Maharashtra News Live Update: जालन्यात कृषीविभागाने फुकट वाटलेलं महाबीजचे सोयाबीन बियाणे उगवलच नाही

गावरान स्टाईलची चिचुर्ड्याची भाजी तुम्ही कधी खाल्लीये का? एकदम सोपी आहे रेसिपी

Face Care: चेहऱ्यावरील सूज आणि ओपन पोर्स कमी करायचे आहेत? मग करा ही १ मिनिटाचा सोपा घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT