Sharad Pawar SaamTv
Video

VIDEO : त्यांना फक्त बोलता येतं, कृती करता येत नाही; शरद पवारांची मोदींवर खोचक टीका

Sharad Pawar News : शेवगाव विधानसभा मतदारसंघात आज महाविकास आघाडीचे उमेदवार प्रताप ढाकणे यांची प्रचारसभा पार पडली. यावेळी शरद पवार यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.

Saam Tv

लोकसभेत जनतेने आम्हाला ताकत दिली आहे. मोदी यांना थांबवण्याचा प्रयत्न जनतेने केला लोकसभेत केला आहे, असं शरद पवार यांनी म्हंटलं आहे. शेवगावमध्ये मविआचे उमेदवार प्रताप ढाकणे यांच्या प्रचारसभेत शरद पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याचं पाहायला मिळालं.

शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय आमच्या सरकारने घेतला होता. मात्र, आता पंतप्रधान मोदी असे निर्णय घेऊ शकणार नाहीत. कारण ते भाषण करण्यात हुशार आहेत, ते कृती करत नाही, असा खोचक टोलाही पवार यांनी लगावला. घटना बदलायची असेल तर चारशे पारची आवश्यकता होती असं त्यांचे खासदार बोलत होते. मात्र आम्ही सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येऊन बाबासाहेबांनी देशाला दिलेली घटना वाचवण्याचं ठरवलं असल्याचं देखील शरद पवार यावेळी म्हणाले. दरम्यान, बबनराव ढाकणे यांच्या बरोबर मी काम केलं आहे. त्यांनी उभ आयुष्य जनतेसाठी अर्पण केल होत. आता त्यांचा मुलगा प्रताप ढाकणे यांना निवडून देणं हे आपलं कर्तव्य असून ढाकणे यांना विजयी करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं.

Edited By Rakhi Rajput

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : "आम्हाला वेगळा न्याय का? राणा दांपत्याची भाजपमधून हकालपट्टी करा"

PM Modi In Mumbai: पंतप्रधान मोदींच्या प्रचार सभेसाठी खारघरमधील वाहतुक मार्गांमध्ये मोठे बदल, 'या' ठिकाणी नो पार्किंग झोन

Maharashtra News Live Updates : गौतम अदानींना विरोध म्हणजे देशाला आणि महाराष्ट्राला विरोध - नितीश राणे

Government Job: चौथी आणि दहावी पास तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, कोचिन शिपयार्डमध्ये जॉब; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: अचानक वेगाने गेंडा आला रस्त्यावर, लोकांना पळता येईना, पुढे जे घडलं ते पाहा

SCROLL FOR NEXT