Ajit Pawar SaamTv
Video

Solapur News : सोलापूरमधून अजित पवारांना मोठा धक्का, निरंजन भूमकरांनी 'तुतारी' हाती घेतली | Marathi News

Ajit Pawar Rashtrawadi Group : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोलापूरमधून मोठा धक्का बसला आहे. वैराग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांनी १५ नगरसेवकांसह शरद पवार गटात प्रवेश केला आहे.

Saam Tv

सोलापूरमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोलापूरमधून मोठा धक्का बसला आहे. अजित पवार गटाचे निरंजन भूमकर यांनी शरद पवार यांच्या गटात प्रवेश करत तुतारी हाती घेतली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात सोलापूर विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांना हा मोठा धक्का म्हणावा लागणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तिकीट न मिळाल्याने नाराजी नाट्य सुरू असून अनेक नाराजांकडून बंडखोरी किंवा पक्ष सोडण्याचे प्रकार समोर येत आहे. सोलापूरमध्ये देखील अजित पवार गटाचे बार्शी तालुक्यातील नेते निरंजन भूमकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. शरद पवारांच्या उपस्थितीत गोविंद बाग येथे निरंजन भूमकरांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. वैराग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांच्यासह १५ नगरसेवकांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. निरंजन भूमकर हे वैराग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत. वैराग नगरपंचायतीवर निरंजन भूमकर यांची एक हाती सत्ता आहे. भूमकर यांनी अजित पवारांची साथ सोडल्याने विधानसभेत याचा मोठा फटका अजित पवारांना बसण्याची शक्यता आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Politics: ऐन निवडणुकीत मनसेला पुन्हा झटका; बड्या महिला नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

Sujay Vikhe Entry: 'टायगर अभी जिंदा है' ! शिर्डी नगरपालिकेत भाजपच्या जयश्री थोरातांचा शानदार विजय, चर्चेत आली सुजय विखेंची दिमाखदार एन्ट्री

Monday Horoscope : घाईगडबडीने निर्णय घेऊ नका; ५ राशींच्या लोकांची नैराश्य, कटकटीपासून होणार सुटका

Shocking : निवडणुकीच्या विजयाच्या जल्लोषादरम्यान लागली आग; राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक होरपळले, 14 कार्यकर्ते जखमी

Chandrapur Civic Elections: चंद्रपुरात काँग्रेसचा मोठा विजय, किंगमेकर विजय वडेट्टीवारांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT