Daulat Daroda News SaamTv
Video

Daulat Daroda News : शहापूर विधानसभेत पाचव्यांदा निवडून आलेल्या दौलत दरोडांनी व्यक्त केले आभार

Shahapur Assembly Constituency : शहापुर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार दौलत दरोडा यांचा विजय झाला आहे. त्यांच्या विरोधात याठिकाणी मविआचे पांडुरंग बरोरा हे निवडणूक रिंगणात होते.

Saam Tv

शहापुर विधानसभा मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत महायुती राष्ट्रवादी जित पवार गटाचे उमेदवार दौलत दरोडा यांचा विजय झाला. महाविकास आघाडीचे उमेदवार पांडुरंग बरोरा यांचा १६७२ मतांनी दरोडा यांनी पराभव केला आहे. दरोडा हे पाचव्यांदा विधानसभेची निवडणूक जिंकले आहेत. विजयानंतर दौलत दरोडा यांनी साम टीव्हीवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना दौलत दरोडा म्हणाले की, 1995 पासून मी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो आहे. आत्तापर्यंत लढवलेल्या 7 निवडणुकीपैकी मी पाचवेळा विजयी झालो आहे. अजित पवार यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला यावेळी पुन्हा एकदा संधी दिली आहे. इथल्या मतदारांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्यावर मी खरं उतरण्याचा प्रयत्न करेल. येणाऱ्या पाच वर्षात शहापूर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही देखील दरोडा यांनी यावेळी बोलताना दिली आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT