Sunil Tingre SaamTv
Video

Sunil Tingre : अखेर वडगाव शेरीत टिंगरेंना उमेदवारी जाहीर

Mahayuti News : राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार यांच्या गटाकडून सुनील टिंगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपचे जगदीश मुळीक यांना डावलून ही उमेदवारी दिल्याने आता ते काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Saam Tv

सुनील टिंगरे यांना अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार यांच्या गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. वडगाव शेरी मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार आहेत. याठिकाणी भाजपकडून जगदीश मुळीक हे इच्छुक होते. कल्याणीनगर अपघात प्रकरणात सुनील टिंगरे यांना उमेदवारी मिळणार की नाही याबाबत संभ्रम होता. मात्र आज त्यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यामुळे आता भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक काय भूमिका घेणार हे पाहाणं महत्वाचं असणार आहे.

वडगाव शेरी मतदारसंघातून महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटकडून सुनील टिंगरे आणि भाजपकडून जगदीश मुळीक हे दोघे उमेदवार इच्छुक होते. त्यामुळे इथे तिढा निर्माण होण्याची शक्यता होती. त्यानंतर आज सुनील टिंगरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे जगदीश मुळीक यांची भूमिका महत्वाची असणार आहे. तर सुनील टिंगरे यांना शरद पवार यांनी 'जनताच तुझा बंदोबस्त करेल' असा दम भरला होता. त्यामुळे आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना उमेदवारी मिळाल्याने या ठिकाणी राजकीय समीकरण बदलेल का हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT