Nawab Malik News SaamTV
Video

Nawab Malik News : नवाब मलिकांकडून दोन उमेदवारी अर्ज दाखल ? लवकरच स्पष्ट करणार भूमिका

Mankhurd - Shivajinagar News : मानखुर्द-शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघातून नवाब मलिक यांनी अपक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असे दोन उमेदवारी अर्ज भरले असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

Saam Tv

नवाब मलिक यांनी अपक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या दोन्ही पक्षांच्या नावे आज उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मानखुर्द-शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघातून त्यांनी हे अर्ज दाखल केले आहे. तर मी कोणत्या पक्षाकडून लढणार हे ३ वाजता जाहीर करेन असं नवाब मलिक यांनी म्हंटलं आहे.

मानखुर्द-शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघातून नवाब मलिक यांना पक्षाकडून एबी फार्म मिळाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज भरले आहेत. मानखुर्द-शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघातून शिंदेच्या शिवसेनेकडून सुरेश पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काल मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी सुरेश पाटील यांना एबी फॉर्म देण्यात आला. सुरेश पाटील हे आज शिवाजीनगर-मानखुर्द या विधानसभेतून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यामुळे नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरणार की अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत ते उमेदवारी अर्ज भरून झाल्यावर ३ वाजता माध्यमांशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT