Police investigation underway after violent garbage dispute assault in Taloja, Navi Mumbai. Saam Tv
Video

इथे कचरा का टाकला? तरुणांची तुंबळ हाणामारी, एकावर धारदार शस्त्राने वार, VIDEO

Violent Clash Over garbage Dumping In Navi Mumbai Taloja Area: नवी मुंबईतील तळोजा परिसरात कचरा टाकण्याच्या वादातून 20 हून अधिक तरुणांनी वेअरहाऊस कर्मचाऱ्यांवर लाठ्या, खुर्च्या आणि चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Omkar Sonawane

विकास मिरगणे, साम टीव्ही

नवी मुंबई: तळोजा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील किरवली मधील ॲमेझॉन कोल्ड स्टार वेअर हाऊस वर काम करणाऱ्या तिघांना कचरा टाकण्याच्या वादातून जवळपास 20 पेक्षा जास्त मुलांनी मिळून काठी,खुर्च्या,पट्ट्याने जबर मारहाण केल्याच्या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ हाती लागला असून घटनेची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात दाखल झाली असून यातील शोएब शेख आणि त्याच्या अन्य तीन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.मात्र व्हिडीओमध्ये दोनपेक्षा खूपच जास्त व्यक्ती मारहाण करताना दिसत आहेत.

मात्र, नक्की कचऱ्यावरून इतके टोकाचे भांडण झाले का,की इतक्या जणांनी तिघांवर जीवघेणा हल्ला केला,याबाबत कोणताही खुलासा नाही.मारहाण झालेल्या मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.त्यातील ऋषिकेश वावेकर याच्या डोक्यावर चाकूने वार झाला असून केतन गोंधळी आणि राहुल माळी यांनाही जबर दुखापत झाली आहे.आता पोलिस याबाबत आणखी काय कारवाई करत आहेत हे पाहणे महत्वाचे असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT