Navi mumbai Police viral video saam tv
Video

Navi Mumbai Video : पोलीस अधिकाऱ्यानं रीलच्या नादात काय केलं बघा? VIDEO

Navi Mumbai Police Traffic Rules : नवी मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यानं रीलच्या नादात वाहतूक नियमांचा भंग केलाय. रील तयार करण्यासाठी त्यानं आपल्या चिमुकल्या मुलीच्या हातातच कारची स्टिअरिंग दिलीय. आता या अधिकाऱ्यावर कोणती कारवाई होणार?

Saam Tv

रीलचा नादच लय बेक्कार. काही जण रीलसाठी कुठलंही धाडस करतात. अगदी जीवाची पर्वाही करत नाहीत. असे प्रकार रोखण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करत असतं. रील करताना स्टंटबाजी करणाऱ्यांवर पोलीस धडक कारवाई करतात. प्रसंगी दंडवसुलीही करतात, पण आता पोलीसच त्याच्या आहारी गेला आणि नियम मोडला तर त्याला काय म्हणावं?

नवी मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यानंही रीलच्या नादात वाहतूक नियम पायदळी तुडवलेत. त्यानं आपल्या चिमुकल्या मुलीच्या हातात स्टिअरिंग दिली आणि रील तयार केली. नेरूळच्या पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरिक्षक बिपीन तुतूरवाड यांचा निष्काळजीपणा यातून समोर आला आहे. लहान मुलीच्या हाती त्यांनी कारची स्टिअरिंग दिली आणि रील तयार केली. हा व्हिडिओ व्हायरल झाला. वाहतूक नियम सर्वसामान्यांनी मोडला तर, त्याच्यावर लगेच कारवाई होते. आता या पोलीस अधिकाऱ्यानंच वाहतूक नियम मोडला आहे. या बेजबाबदार अधिकाऱ्यावर आता कारवाई होणार का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मित्रानेच खुपसला भारताच्या पाठीत खंजीर, भारतीय तेल टँकरवर इराणची फायरिंग

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : बिग बॉस मराठीच्या घरातील 'रणरागिणी' चा पत्ता कट; शेवटच्या क्षणी बाजी पलटली | VIDEO

अमेरिका इराण युद्ध पुन्हा भडकणार? होर्मुझवरुन इराणचा अमेरिकेला इशारा

TCS धर्मांतर प्रकरणानंतर मुंबईतही धक्कादायक प्रकार; प्रेमाच्या बहाण्याने १६ वर्षीय तरुणीला पळवलं

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी आवकाळी पाऊस

SCROLL FOR NEXT