Navi Mumbai Mahapalika Bribery Case saam tv
Video

Bribe Case : नवी मुंबईत खळबळ; महापालिका मुख्यालयातच उपायुक्ताला लाच घेताना रंगेहाथ पकडलं

NMMC Bribe Case : नवी मुंबई महापालिकेचे उपायुक्त कैलास गायकवाड यांना एसीबीने लाच घेताना रंगेहाथ पकडलं. गायकवाड यांना अटक केली आहे.

Nandkumar Joshi

विकास मिरगणे, नवी मुंबई | साम टीव्ही

नवी मुंबई महापालिका उपायुक्त कैलास गायकवाड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अटक केली. या लाचखोरीच्या प्रकरणामुळं नवी मुंबईत खळबळ उडाली आहे. गायकवाड यांना ४२ हजार रुपयांची लाच घेताना त्यांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडलं.

कैलास गायकवाड कसे अडकले एसीबीच्या जाळ्यात?

नवी मुंबई महापालिकेचे उपायुक्त कैलास गायकवाड यांना ४२ हजारांची लाच घेताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. कंत्राटदाराकडून लाच घेताना ही कारवाई केली आहे. अतिक्रमण विभागाचे बिल काढण्यासाठी पैशांची मागणी केल्याची तक्रार त्यांनी केली होती. १५ नोव्हेंबर २०२४ ते १५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ऐरोली विभागात केलेल्या कामाचा मोबदला देण्यासाठी लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. तक्रारीनंतर सापळा रचून एसीबी पथकाकडून त्यांना अटक करण्यात आली. नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयातच पथकाने सापळा रचला होता. गायकवाड यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील शिरलस शेतशिवारात बिबट्याचा वावर

Velachiche Pani: १ ग्लास वेलचीचे पाणी ठरेल 'अमृत', १५ दिवसांत शरीरात दिसेल बदल

Monsoon health tips: पावसाळ्यात आजारांपासून दूर राहायचंय? आहारात व्हिटॅमिन C असलेले पदार्थ ठेवा!

Fried Modak Recipe: गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गणरायासाठी बनवा खुसखुशीत स्वादिष्ट तळणीचे मोदक; वाचा सोपी रेसिपी

Mysterious Fort : सोनं-चांदीने भरलेल्या विहिरी! 'या' किल्ल्यातील गुप्त खजिन्याचं रहस्य आजही कायम

SCROLL FOR NEXT