Angry onion farmers protesting in Nashik, smashing onions outside the District Collector's office, demanding fair market rates. Saam Tv
Video

Nashik News: जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनावर फेकले कांदे; नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा संताप उसळला|VIDEO

Nashik Onion Farmers Protest: कांद्याच्या घसरत्या दरामुळे नाशिकमधील शेतकरी संतप्त झाले असून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कांदे फेकून आंदोलन केलं.

Omkar Sonawane

नाशिक कांदा उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले..कांद्याच्या मुद्द्यावर चर्चेसाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला अधिकाऱ्यांनी वेळ न दिल्याने शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर कांदा फेकून आपला रोष व्यक्त केला आणि थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर कांदे फोडून आपला निषेध व्यक्त केला.

आक्रमक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेरच घोषणाबाजी करायला सुरुवात केल्यानं पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केल्याने आंदोलक आणखी आक्रमक झाले. आंदोलकांनी थेट निवासी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेरच पुन्हा एकदा कांदे फोडले, आपल्यासोबत आणलेली शिदोरी सोडून निवासी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेरच ठिय्या मांडून कांदा भाकर आंदोलन सुरू केल्यानं काही काळ जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळाच वातावरण निर्माण झालं होतं. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण सुरू असल्याने बाजार हस्तक्षेप योजना राबवण्याची तसच कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव देण्याची मागणी शेतकरी कृती समितीने केली आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS TRANSFERS: राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती वाचा

ED Raids : माजी आयुक्त अनिलकुमार पवारांच्या घरी ईडीचा छापा; संपत्ती जाणून डोळे पांढरे होतील, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमंती अशिमा मित्तल यांची नियुक्ती

Tariff : ट्रम्पचा धक्का, भारताला फटका? कोण-कोणत्या उद्योगांवर होणार परिणाम, जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : राज्यातील ५० लाख बहिणी अपात्र ठरल्या; काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT