Lasalgaon News SaamTv
Video

Lasalgaon News : कांद्याचा वांदा कायम! दरातील घसरण सुरूच असल्याने लिलाव पडला बंद

Onion Auction Protest : कांद्याच्या दरात घसरण झाल्याने लासलगाव येथे संघटनांच्यावतीने लिलाव बंद पाडण्यात आला आहे. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली.

Saam Tv

नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत राज्य कांदा उत्पादक संघटनेतर्फे लिलाव बंद पाडत आंदोलन करण्यात आलं आहे. कांद्याच्या भावात मोठी घसरण होत असल्याने निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. याच सगळ्या मागण्यांसाठी आंदोलन देखील पुकारण्यात आलं आहे.

कांद्याचे भाव सातत्याने घसरत आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले आहेत. कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून कांदा उत्पादक करत आहेत. त्याच अनुषंगाने आज भावातील घसरण बघता नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे बाजार समितीत सुरू असलेला कांद्याचा लिलाव बंद पाडण्यात आला आहे. राज्य कांदा उत्पादक संघटनेने लिलाव बंद पाडत आंदोलन देखील केले. यावेळी कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करण्याच्या मागणीसह इतर मागण्या करण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT