Nashik Lok Sabha Constituency News Today Saam TV News
Video

Nashik Chhagan Bhujbal News: नाशिकमधून छगन भुजबळ यांची मोठी राजकीय खेळी! महायुतीमध्ये नाशिकच्या जागेवरुन रस्सीखेच कायम?

Nashik Lok Sabha Constituency News Today: भुजबळांचे विश्वासू सहकारी दिलीप खैरे यांनी अर्ज घेतल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

Saam TV News

नाशिक : नाशिकमधून मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. नाशिकमधून महायुतीमध्ये अजूनही रस्सीखेच सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. छगन भुजबळांनी नाशिक लोकसभेतून माघार घेतली. त्यानंतर आता भुजबळांचे विश्वासू सहकारी दिलीप खैरे यांनी अर्ज घेतल्यानं एकच खळबळ उडाली आहे. दिलीप खैरेंचे बंधू अंबादार खैरे यांनी हा अर्ज घेतल्याचं समोर आलंय. महायुतीकडून शिवसेनेनं नाशिकच्या जागेवर दावा केलाय. अशातच नाशकात काल राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती. त्यानंतर आता छगन भुजबळ यांच्याकडून मोठी राजकीय खेळी केल्याची चर्चा रंगली आहे. भुजबळांच्या गोटातील उमेदवार दिला जाणार असल्यानं नाशिकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. एकीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून हेमंत गोडसे आणि अजय बोरस्ते तर दुसऱ्या बाजूला भाजपकडून स्वामी शांतिगिरी महाराज बाशिंग बांधून बसले आहेत. अशात नाशिकमधून महत्त्वाची अपडेट समोर आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sindhudurg Fort : सिंधुदुर्गच्या समुद्रकिनाऱ्यावरील छुपा किल्ला; इतिहासात दडली आहेत रहस्ये, अनुभवाल नजरेत भरणारे सौंदर्य

Stye Eye Care : डोळ्याला रांजणवाडी येण्याआधी दिसतात 'ही' ६ लक्षणे, वेळीच जाणून घ्या नाहीतर...

Maharashtra News Live Update: आपल्या मागण्यासाठी महिलांनी सिंचन भवन येथील संबंधित अधिकाऱ्याच्या टेबलवर फोडल्या बांगड्या

Good News: ST प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, घरबसल्या NCMC कार्ड रिचार्ज करता येणार; कसं ते वाचा...

Shiv Sena Symbol Hearing: दोन्ही शिवसेनेने बाळासाहेबांच्या नव्हे, तर स्वतःच्या बळावर लढावे; सुप्रीम कोर्ट

SCROLL FOR NEXT