Nashik News SaamTv
Video

Nashik Rain News : एका तासाच्या पावसात नाशिकचे रस्ते जलमय | VIDEO

Heavy Rainfall In Nashik : राज्यात अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. नाशिक मध्ये काल झालेल्या अवकाळी पावसाने शहरातील सर्व रस्त्यांवर पाणी साचलेलं दिसत आहे.

Saam Tv

नाशिक शहरात रात्री झालेल्या एका तासाच्या पावसाने शहरातील रास्ते जलमय झाले आहेत. तर नाशिक-मुंबई महामार्गावरील द्वारका जवळच्या उड्डाणपूलावर पाणी साचलं आहे. त्यामुळे हा उड्डाणपूल आहे की तलाव असा प्रश्न वाहनधारकांना पडला. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. पाणी साचल्यामुळे या पूलावरून जाणाऱ्या वाहनांची चांगलीच कसरत झालेली दिसली. केवळ एकाच तासांच्या या पावसात नाशिकचे हाल बेहाल झालेले बघायला मिळाले आहेत.

दरम्यान, नाशिकसह सांगली, जालन्याला सुद्धा पावसाने चांगलंच झोडपलं आहे. अवकाळी पावसाने राज्यातल्या अनेक जिल्ह्यात नागरिकांची तारांबळ उडवली आहे. या पावसाचा फटका डाळिंब आणि द्राक्ष बागांना बसला आहे. तसच रब्बी हंगामाच्या पिकांचं देखील या अवकाळी पावसाने चांगलंच नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी आता चिंतेत आले आहेत. आजही 10 जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Parenting Tips : मुलांना ओरडल्यानंतर पालकांनी चुकूनही करू नका 'ही' चूक, विश्वासाचं नातं एका क्षणात तुटेल

Pune : पुण्यात पोलिसांनीच केले पोलिसांचे 'स्टिंग ऑपरेशन'! डमी डिलिव्हरी बॉय बनवून केला मोठा पर्दाफाश

Actor Home Fraud: मराठमोळ्या अभिनेत्याची २५ लाखांची फसवणूक; न्यायासाठी वर्षभरापासून करतोय धावपळ

Shocking : पनवेल हादरलं! तरुणाने अल्पवयीन मुलीला सार्वजनिक शौचालयात नेले, लैंगिक अत्याचार केले अन्...

SCROLL FOR NEXT