Mumbai Nashik Highway Flooded | मुसळधार पावसामुळं मुंबई-नाशिक महामार्ग पाण्याखाली गेला आहे.  SAAM TV
Video

Nashik -Mumbai Highway : पावसाचं रौद्ररूप, मुंबई-नाशिक महामार्ग पाण्याखाली, VIDEO बघा

Nashik Heavy Rain : नाशिकला मुसळधार पावसानं जोरदार तडाखा दिला. मुसळधार पावसाचं पाणी मुंबई-नाशिक महामार्गावर आलं. मुंबई नाका येथे रस्ता पाण्याखाली गेला होता. VIDEO पाहा

अभिजीत सोनावणे, सामटीव्ही नाशिक

नाशिक शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. तब्बल तासभर झालेल्या पावसामुळं सर्वांचीच दाणादाण उडाली. नाशिक शहरातील रस्ते जलमय झाले होते. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर नाशिकमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. सिडको, गोविंद नगर, कॉलेज रोड, गंगापूर रोड, पाथर्डी परिसरात मुसळधार पाऊस बरसला. मुसळधार पावसामुळे भुयारी गटार ओव्हरफ्लो झाल्यानं पाणी थेट गोदावरी नदीपात्रात घुसलं.

मुसळधार पावसाचं पाणी नाशिकच्या बाजारपेठांमध्ये घुसलं. यामुळं रक्षाबंधनाच्या दिवशी खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. सराफा बाजार, हुंडीवाला लेन, दहिपुलासह जुन्या नाशिकमध्ये रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं होतं. मुंबई-नाशिक महामार्गावर मुंबई नाका, गोविंद नगर परिसरातील रस्ता पाण्याखाली गेला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: विद्यार्थ्यांना घेऊन जणारी बस दरीत कोसळली, २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू

'सिनेमॅटिक' रिलवरून वाद पेटला; चमकेश तहसीलदार प्रतीक्षा तेजनकरांच्या निलंबनाची मागणी

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

SCROLL FOR NEXT