Nashik Flood Saam TV
Video

Nashik News : दुतोंड्या मारूतीच्या गुडघ्याला लागले पाणी; जाणून घ्या नाशिकची पूरस्थिती

Nashik Flood Update : गंगापूर धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे नाशिकच्या गोदावरी नदीतील पाणी पातळी वाढत आहे. गोदा घाट परिसरातील सर्व मंदिरांना पाण्याने वेढा घातला आहे.

Saam Tv

गंगापूर धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे नाशिकच्या गोदावरी नदीतील पाणी पातळी वाढत आहे. गोदा घाट परिसरातील सर्व मंदिरांना पाण्याने वेढा घातला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये गोदावरी नदीत पुन्हा एकदा पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

गंगापूर धरणातून २२०० क्युसेक वेगाने गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असल्याने गोदावरीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे राम कुंड, गोदावरी घाटाचा परिसरात पाण्याचे प्रमाण वाढले असून गोदा घाटावर असलेल्या सगळ्या मंदिरांना पाण्याचा वेढा पडलेला बघायला मिळत आहे. तर दुतोंड्या मारूतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी पोहोचले आहे. सततच्या पावसाने शहरासह उपनगरीय भागातून पावसाचे पाणी देखील नदीत जाऊन मिसळत असल्याने ही पाणी पातळी अजून काही प्रमाणात वाढू शकते. या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT