ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मुलं जे पाहतात आणि ऐकतात तेच शिकतात. काही मुलं टीव्ही आणि मोबाईल पाहताना वाईट सवयी आणि गोष्टी शिकतात.
शाळेत बऱ्याचदा मुलांना चांगल्या गोष्टी शिकण्याऐवजी कधीकधी वाईट सवयी शिकायला मिळतात. अशावेळी मुलांना घरीच तांगल्या सवयी शिकवल्या जाऊ शकतात.
प्रथम तुमच्या मुलाला नमस्ते, माफ करा, धन्यवाद अशा मूलभूत गोष्टी शिकवा.
जर मूल थोडे मोठे असेल तर त्याला काही जबाबदाऱ्या द्या. जसे की त्याचे कपडे घडी करणे, त्याचे बूट जागेवर ठेवणे, जेवणाची प्लेट उचलणे आणि ठेवणे.
तसेच मुलाला एक टाइम मॅनेजमेंट शिकवा. जेव्हा मूल त्याचे सर्व काम योग्य वेळी करेल तेव्हा त्याला योग्य पद्धतीने काम करण्याची सवय लागेल.
मुलाला मोठ्यांचा आदर करायला शिकवा. जेव्हा कोणी तुमच्या घरी पाहुण येतील तेव्हा त्याला लोकांना भेटण्याची योग्य पद्धत समजावून सांगा.
तसेच मुलाला त्यांच्या गोष्टी शेअर करायला शिकवा. अनेकदा मुलं त्यांच्या गोष्टी दुसऱ्या कोणासोबत शेअर करत नाहीत.