Nashik Rain  Saam Tv
Video

Nashik News : नाशिकमध्ये पावसाचे थैमान, मुसळधार पावसामुळे जुना वाडा कोसळला; पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

Nashik Rain : नाशिकमध्ये सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसामुळे गोदावरी नदी दुथडी भरुन वाहत आहे. सततच्या पावसामुळे जुने नाशिकमधील वाडा कोसळल्याची माहिती समोर आली आहे.

Yash Shirke

नाशिकमध्ये मागील काही तासांपासून जोरदार पाऊस पडत आहे. सततच्या पावसामुळे तेथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. गोदावरी नदीला यंदाच्या हंगामातील पहिला पूर आला आहे. रामकुंड, गोदाघाट हा परिसर पाण्याखाली आला आहे. याच दरम्यान जुने नाशिक येथे वाडा कोसळल्याची माहिती समोर आली आहे. वाडा जमीनदोस्त झाल्याने त्या ठिकाणी मातीचा ढिगारा तयार झाला आहे. हा मातीचा ढिगारा हटवण्याचे काम सुरु आहे. सुदैवाने वाड्यामध्ये कुणीही नव्हते. त्यामुळे जीवितहानी टळल्याचे म्हटले जात आहे. जुन्या नाशिकमधील वाडा कोसळल्याने ७०० पेक्षा जास्त जुने आणि धोकादायक वाड्यांना नोटीस पाठवण्यात आल्याचे म्हटले जात आहे. अद्यापही काही वाड्यांमध्ये नागरिक राहत असल्याने महापालिका प्रशासनाकडून कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच नाशिक शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आहे. पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT