Nashik Godavari River Car Submerged Saam Tv Youtube
Video

Nashik : नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, गोदावरी नदीत कार बुडाली; पाहा थरारक Video

Nashik Godavari River Car Submerged: नाशिक आणि आसपासच्या परिसरात सकाळपासून जोरदार पाऊस आहे. पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. गोदावरी नदीच्या पाण्यात एक कार बुडाल्याची माहिती समोर आली आहे.

Yash Shirke

नाशिकमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे नाशिकमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. यंदाच्या हंगामातील गोदावरी नदीला पहिला पूर आला आहे. रामकुंड, गोदा घाटाचा परिसर पाण्याखाली आला आहे. रामकुंड परिसरातील अनेक मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा लागला आहे. नाशिकमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याने एक कार गोदावरी नदीच्या पाण्यात बुडाल्याचे पाहायला मिळाले. पाण्याची पातळी वाढल्याने ही कार पाण्यात बुडाली. सुदैवाने कारमध्ये कुणीही नसल्याने जीवितहानी टळली आहे. आता कारला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

नाशिकच्या दारणा धरणातून पाणी सोडले जाणार आहे. दुपारी तीन वाजल्यापासून दारणा धरणातून ११०० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सोडणार असल्याचे म्हटले जात होते. धरण ५० टक्के भरल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT