नाशिकच्या दत्त मंदिर सिग्नलवर वाहतूक नियमांचे उल्लंघन करत भरधाव वेगाने कार चालवणाऱ्या चालकाने पोलिस हवालदाराला कारने चिरडण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कारचालकाने सिग्नल तोडून भरधाव वेगाने वाहन पुढे नेले. यावेळी एका महिला दुचाकीस्वाराला कारची धडक बसली. त्यानंतर कार थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिस हवालदारालाही कारच्या बोनेटवर घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी २२ वर्षीय वैभव दांडे याच्याविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई केली आहे. दरम्यान, सुसाट वेगाने कार चालवणाऱ्या संशयिताचा व्हिडिओ समोर आला असून, या घटनेनंतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.