VIDEO : बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात आज नाशिक बंदची हाक SAAM TV
Video

VIDEO : बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात आज नाशिक बंदची हाक

Nashik Band News : नाशिक मध्ये आज हिंदुत्ववादी संघटनांकडून जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे, बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात नाशिक बंद राहणार आहे, तर या आंदोलनाला नाशिक शहरातून सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिक मध्ये आज हिंदुत्ववादी संघटनांकडून जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. नाशिक शहरात सकाळपासून या बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आलाय. दुकान आणि बाजारपेठा बंद ठेवून शहरातील दुकानदार आणि व्यापारी या बंदमध्ये सहभागी झालेत.

बांगलादेशात सध्या अराजक्ता पसरली असून , बांगलादेेशच्या पंतप्रधान शेख हसीना या भारताच्या आश्रयाला आल्या आहेत. बांगलादेशात अस्थिरता आहे. दरम्यान बांगलादेशात राहणाऱ्या हिंदूंवर अत्याचार होत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज नाशिक जिल्ह्यात बंद पुकारण्यात आलाय.नाशिकच्या मुख्य बाजारपेठेतून या संदर्भातला आढावा घेतला आहे साम टीव्हीचे प्रतिनिधी अभिजीत सोनवणे यांनी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Vidyapeeth: शिक्षकांची माहिती अपलोड करा, अन्यथा प्रवेश बंद; पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय

Pune : मध्यरात्री बुधवार पेठेत पोलिसांचा छापा, 5 बांगलादेशी महिलांना अटक

Maharashtra News Live Update: निदा खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Weak Bones: तरूण वयातच हाडं झाली खिळखिळी? फक्त कॅल्शियम नाही, तर ही लक्षणे दिसल्यास व्हा सावध

मंत्री, खासदार, आमदारांचे तातडीने सर्व दौरे रद्द; भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन, पक्षावर कोसळला दु:खाचा डोंगर

SCROLL FOR NEXT