Nasarapur Crime Saam Tv
Video

Nasarapur Crime: नसरापूरमध्ये ४ वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाचा फोटो समोर

Pune Crime News: पुण्यातील नसरापूरमध्ये ४ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील ६५ वर्षीय आरोपीचा फोटो समोर आला आहे. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.

Priya More

पुणे जिल्ह्यातील नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीचा पहिला फोटो समोर आला आहे. ६५ वर्षांच्या आरोपीने चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली. आरोपीला ७ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज पुणे सत्र न्यायालयासमोर सुनावणी पार पडली. आरोपीला कोर्टातून नेताना गावकरी संतप्त झाले होते. यावेळी त्यांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. आरोपीने याआधी देखील अशाच प्रकारचे गुन्हे केले होते त्याप्रकरणी तो तुरुंगवासाची शिक्षा देखील भोगून आला होता.

पीडित चिमुकली आजोळी आजीकडे आली होती. त्यावेळी आरोपीने चार वर्षांच्या चिमुकलीला वासरू दाखवतो सांगत गोठ्यात नेले. त्याठिकाणी आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. आरोरी ऐवढ्यावर थांबला नाही तर त्याने तिची हत्या केली. घटनेविषयी कुणाला कळू नये यासाठी त्याने तिचा मृतदेह गोठ्यात शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला होता. आरोपी चिमुकलीला गोठ्याच्या दिशेने घेऊन जात असल्याचे सीसीटीव्हीत कैद झालं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: ड्रग्सच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी, २२ वर्षीय इंजिनिअरचा घाबरून मृत्यू; पुण्यात खळबळ

Maharashtra News Live Update: ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सोलापुरात काँग्रेसची रॅली

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! शिपायापासून सचिवांपर्यंत किती असेल पगार?

Bathroom mirror cleaning: आरशावरचे हट्टी डाग कसे काढाल? या 5 टीप्सने होईल आरसा होईल चकचकीत

Maharashtra Politics: शिवसेनेत खलबतं! एकनाथ शिंदे मंत्र्यांवर नाराज, तातडीची बैठक बोलावत दिली तंबी

SCROLL FOR NEXT